Friday, April 26, 2024
Homeनगरअवैध दारु विक्रेत्यांसाठी लॉकडाऊन पर्वणी

अवैध दारु विक्रेत्यांसाठी लॉकडाऊन पर्वणी

सलाबतपूर |वार्ताहर| Salbatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर व परिसरात लॉकडाऊनच्या नावाखाली अवैध व्यावसायिकांकडून

- Advertisement -

तळिरामांची सर्रासपणे लुटमार सुरू असुन दारूची बाटली दुप्पट भावात विकली जात आहे.

सलाबतपूरात अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांकडून मालाची कमतरता भासवत तसेच लॉकडाऊनचा धाक दाखवत एरवी 60 रुपयाला विकली जाणारी 180 मिलीची बाटली चक्क 150 रुपयाला विकली जात असल्याची चर्चा सध्या तळीरामांमध्ये सुरू आहे.

यामुळे अर्थिक अडचणीतही आपला शौक पूर्ण करताना तळीरामांची चांगलीच कुचंबना होताना दिसते आहे. तर दुसरीकडे पोलिसांचे कायमच ‘आशीर्वाद’ असलेले अवैध दारू विक्रेते आपला गल्ला भरताना कुठलीच कसर सोडताना दिसत नाही. पोलिसांच्या कृपेमुळे अवैध व्यावसायिकांची कायमच दहशत राहिली आहे.

सध्या सर्वत्र करोनाचा कहर सुरू आहे. अनेक लोक मरणाशी दोन हात करताना दिसत आहे. प्रशासकिय यंत्रणा अहोरात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी झगडताना दिसत आहे. इतर व्यावसायिक आपले दुकाने बंद ठेऊन शासनाला सहकार्य करत आहे. असं सर्व असताना अवैध दारू विक्रेत्यांना दुप्पट भावात अवैधरित्या दारू विकण्यास सवलत दिली गेली काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या