Friday, April 26, 2024
Homeनगरअवैध 35 हजाराची दारू जप्त

अवैध 35 हजाराची दारू जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैध गावठी हातभट्टी, देशी व ताडी दारूची विक्री करणार्या एकाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली. भाऊ ऊर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

त्याच्याकडून 30 हजार रूपयांची तीनशे लीटर हातभट्टी दारू, 2 हजार 834 रूपयांच्या 109 देशी दारूच्या बाटल्या व तीन हजार रूपयांची ताडी अशी 35 हजार 834 रूपये किंमतीची दारू जप्त केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घासगल्ली येथे भिंगारदिवे याच्या घरी छापा टाकला असता हा दारू साठा मिळून आला.

पोलीस निरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस कर्मचारी गोविंद गोल्हार, व्ही. जी. धामणे, बी. जी. खेडकर, अंबादास पालवे, सचिन धोंडे, एस. बी. साळवे, अरूण मोरे, हेमंत खंडागळे, सागर द्वारके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या