Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपाझर तलावातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा

पाझर तलावातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा

वावी । Vavi

मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गाच्या ठेकेदाराकडून दुसंगवाडीतील पाझर तलावातून बेकायदेशीरपणे पाण्याचा उपसा केला जात आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा हा प्रकार त्वरीत थांबवावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

दुसंगवाडी येथे जवळपास 107 हेक्टर क्षेत्रावर 1972 च्या दुष्काळाच्या काळात या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या पाझर तलावातून समृद्धी महामार्ग जात असून तलावाचे 19 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे या पाझर तलावाचा पाण्याचा श्रोत आधीच कमी झाला आहे.

त्यात सुरू असणार्‍या कामामुळे या पाझर तालावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठ्याची साठवण होऊ शकलेली नाही. त्यातच संबंधित ठेकेदाराकडून राजरोसपणे टँकरद्वारे पाणी पळवले जात असून शेतकर्‍यांनी तक्रार केल्यानंतरही प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे.

शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी पळवण्याचा हा प्रकार त्वरीत थांबवावा व बेकायदेशीरपणे पाणी पळवणार्‍या ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या