Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र१८ वर्षांखालील मुलांना मॉल प्रवेशासाठी ओळखपत्र बंधनकारक

१८ वर्षांखालील मुलांना मॉल प्रवेशासाठी ओळखपत्र बंधनकारक

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्समध्ये (Shopping malls) प्रवेश करण्यासंदर्भात सोमवारी राज्य सरकारने (State Government) नव्याने सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार १८ वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेश देताना त्यांचे वयासंदर्भातील ओळखपत्र (identity card) दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

मॉलमध्ये प्रवेश करणारे तसेच मॉलमधील कर्मचारी आणि व्यवस्थापन कर्मचारी या सर्वांचे दोन डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील,असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने आज मार्गदर्शक सूचन जारी करण्यात आल्या. राज्यातील शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा याआधीच देण्यात आली आहे.

तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्यांना सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणारच्या दोन मात्रा पूर्ण आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील.

तसेच लसीकरण प्रमाणपत्र आणि त्यासोबत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहील. वय वर्ष १८ खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने या वयोगटातील मुलांना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड तसेच पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असल्याचा शाळा वा महाविद्यायलाचे ओखळपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहील, असे सूचनांमध्ये नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या