Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाWTC Final : 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चा महासंग्राम आजपासून

WTC Final : ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चा महासंग्राम आजपासून

दिल्ली l Delhi

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. साऊथहॅम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाने मागील झालेल्या मालिकात घवघवीत यश मिळवले आहे तर न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडला त्यांच्या भूमीवरील कसोटी मालिकेत १-० असे नमवले आहे. दोन्हीही संघाचे पारडे जड असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर कोण आपले नाव कोरणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कसोटी क्रिकेटमधील जगज्जेतेपद देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. विविध संघांमधील द्विराष्ट्रीय मालिकांतील गुणपद्धतीनुसार दोन अव्वल संघांमधील अंतिम सामन्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) महत्त्वाकांक्षी योजना आता अंतिम टप्प्यात आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी जग्गजेतेपदाच्या या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक तीन वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक अडीज वाजता सामन्याच्या नाणेफेकीला विराट आणि केन मैदानात जातील. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुनील गावस्करांच्या साथीला माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची कॉमेन्ट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

..असा असेल भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा

..असा असेल न्यूझीलंचा संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग

दरम्यान, आजच्या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकल्यास काय निर्णय घ्यावा, याबद्दल BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. “भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा. कारण ढगाळ वातावरण असलं तरी परदेश दौऱ्यात प्रथम फलंदाजी करणे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरलं आहे,” असं सौरव गांगुली याने म्हटलं आहे. तसेच “तुम्ही जर रेकॉर्ड पाहिले तर जेव्हा भारताने प्रथम फलंदाजी केली आहे तेव्हा सामने जिंकले आहेत. परंतु, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला प्रेशर घ्यायचं की चौथ्या डावापर्यंत थांबायचं, हा तुमच्या निवडीचा प्रश्न आहे. अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या दोघांनी कमीत कमी २० ओव्हर फलंदाजी करुन चांगली सुरुवात दिल्यास चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना धावांचा डोंगर उभा करण्यास अधिक मदत होईल. सध्या न्युझीलँडची टीम ही गेल्या ३०-३५ वर्षातील सर्वोत्कृष्ट टीम आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये त्यांनी टीम साऊथी आणि केन विलियमसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांना इंग्लंडला मात दिली. अशा आत्मविश्वासाने भरलेल्या न्युझीलंड टीमला सहज हरवणे सोपे नाही,” असंही गांगुली म्हणाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या