Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाICC T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहिर; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

ICC T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहिर; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

दिल्ली | Delhi

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup 2021) गटांची घोषणा केली आहे.

- Advertisement -

या टी२० विश्वचकासाठी गटवारी संघांच्या २० मार्च २०२१ पर्यंतच्या क्रमवारीनुसार करण्यात आली आहे. या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थांनांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.

आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीत गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत.

हा विश्वचषक यापूर्वी भारतात आयोजित केला जाणार होता. मात्र, करोनाचे संकट पाहाता विश्वचषकचे आयोजन ओमान आणि युएईमध्ये करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या