Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक जि. प. सीईओ भुवनेश्वरी एस. यांच्यासह ठाकरे सरकारने केल्या ‘या’ आयएएस...

नाशिक जि. प. सीईओ भुवनेश्वरी एस. यांच्यासह ठाकरे सरकारने केल्या ‘या’ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | प्रतिनिधी 

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची नुकतीच बदली झाली आहे. भुवनेश्वरी या आता भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलीवर येणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  आज या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई महानगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्यासह मुंबईतील इतर काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

काही अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबई पालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची पुण्यात समाज कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांची भंडारा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या 

श्रीमती जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई

श्री एस ए तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योग

डॉ. के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई

श्री बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने

श्री संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई

श्री राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास

श्री असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा

श्री दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली

श्री प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे

श्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे

श्री डी डी पांढरपट्टे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली महा संचालक माहिती व जनसंपर्क मुंबई

श्रीमती शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई

श्री पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका

श्रीमती मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर

श्री डी डी पांढरपट्टे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली महा संचालक माहिती व जनसंपर्क मुंबई

श्री मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर

श्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे

श्री शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा

श्रीमती नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

श्री दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली

श्री आर बी भोसले जिल्हाधिकारी सोलापूर यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण

श्री शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा

डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे

श्रीमती भुवनेश्वरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदावर

श्री आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर

श्री मदन नागरगोजे यांची बदली संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदावर बदली

- Advertisment -

ताज्या बातम्या