Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढणाऱ्या 'त्या' IAS दाम्पत्याला केंद्राचा दणका

कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढणाऱ्या ‘त्या’ IAS दाम्पत्याला केंद्राचा दणका

दिल्ली । Delhi

दिल्लीत एका आयएएस दाम्पत्याला आपल्या पाळीव कुत्र्यावर प्रेम व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव थांबवून पाळीव कुत्र्यासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार (Sanjeev Khirwar) आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा (inku Dugga) यांची एकाच वेळी बदली केली. खिरवार यांना लडाखला, तर डुग्गा यांना अरुणाचलमध्ये पाठवण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती समोर येतं केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेची दखल घेत अहवाल मागवला होता. त्यानुसार मुख्य सचिवांनी गुरुवारी संध्याकाळी यासंबंधीचा अहवाल गृहखात्याला सोपवला. त्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे अनेकजणांनी कौतुक केले आहे.

काय आहे प्रकरण?

माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार ‘गेल्या काही महिन्यांपासून खिरवार यांना संध्याकाळी स्टेडिअममध्ये डॉग वॉक करता यावा म्हणून खेळाडूंना लवकर मैदामाच्या बाहेर काढले जात असे. यापूर्वी रात्री ८.३०-९ पर्यंत खेळाडू त्यागराज स्टेडिअममध्ये सराव करत, पण खिरवार यांच्या फिरण्यात अडथळा नको म्हणून त्यांना संध्याकाळी ७ वाजताच मैदानाच्या बाहेर काढले जात असे. याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर होत होता.

दरम्यान संजीव खिरवार यांनी आपण कधी-कधी कुत्र्यासोबत इथं फिरायला येतो, हे मान्य केलं होतं.त्यामुळे सरावात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. आपण कुत्र्याला कधीही ट्रॅकवर सोडत नाही, तसंच कोणत्याही खेळाडूला बाहेर जाण्यास कधी सांगितलं नाही, असा त्यांनी दावा केला होता.

अरुणाचलचा अपमान

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोईत्रा यांनी याला अरुणाचलचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या