Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपतीचा खून; पत्नीसह प्रियकराविरूध्द गुन्हा

पतीचा खून; पत्नीसह प्रियकराविरूध्द गुन्हा

मालेगाव । Malegoan

प्रेम संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पतीचा गळा आवळून निर्घृण खून करीत मृतदेह (Husband Murder) मांजरे शिवारात सौंदाणे-सावकारवाडी (Saundane Sawkarwadi) रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याच्या संशयावरून पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराविरूध्द खुनाचा गुन्हा (Murder Case) दाखल केला आहे. या घटनेने झाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

देवीदास कारभारी ठाकरे (40, रा. नेहरूनगर, झाडी शिवार) हे त्या मृत तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Thane) मृताचा भाऊ दीपक ठाकरे याने दाखल केलेल्या फिर्यादीत मृत भावाची पत्नी सुनीता उर्फ राणी देविदास ठाकरे व सोयगाव येथील सागर राजेंद्र इंगळे यांच्यात प्रेमसंबंध असल्याने या प्रेमसंबंधास अडथळा नको म्हणून दोघांनी भाऊ देविदास याचा गळा आवळून निर्घृण खून केला असावा, असा संशय व्यक्त करीत मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मांजरे शिवारात रस्त्याच्या कडेला रात्री फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनीता ठाकरे व सागर इंगळे या दोघांविरूध्द भादवि 302, 201, 34 अन्वये गुन्हा (Case filed) दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या