Tuesday, April 23, 2024
Homeनगरपती-पत्नीला घरात घसून मारहाण

पती-पत्नीला घरात घसून मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

अनाधिकृत पणे घरात घुसून पती पत्नीला (Husband Wife) काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून दमदाटी करण्यात आली. ही घटना राहुरी (Rahuri) तालुक्यातील पाथरे खुर्द (Pathare Khurd) येथे घडली असून या घटने बाबत 13 जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

विद्युत तार अंगावर पडल्याने 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू !

अगस्तीन दगडू पठारे, वय 77 वर्षे, हे राहुरी (Rahuri) तालुक्यातील पाथरे खुर्द (Pathare Khurd) येथे राहत आहेत. दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता तसेच 29 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास या घटनेतील आरोपींनी गैर कायद्याचे मंडळी एकत्र येऊन अगस्तीन पठारे यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अगस्तीन दगडू पठारे व त्यांच्या पत्नीला काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच त्यांच्या घरासमोरील झाडांचे नुकसान केले. या झटापटीत अगस्तीन पठारे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची मंचली गहाळ झाली आहे.

गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा श्रीगोंद्यातून ताब्यात

घटनेनंतर अगस्तीन दगडू पठारे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) आरोपी पांडुरंग कमलाकर पठारे, शिवाजी उर्फ विजय कमलाकर पठारे, राजू कमलाकर पठारे, विश्वनाथ मुरलीधर पठारे, भास्कर विश्वनाथ पठारे, अभिषेक पांडुरंग पठारे, कार्तिक शिवाजी पठारे, रंजना विश्वनाथ पठारे, कल्पना विजय पठारे, सुरेश पांडुरंग पठारे, सरस्वती अशोक तपासे, सर्व राहणार पाथरे खुर्द, तालुका राहुरी. तसेच इतर दोनजण. अशा 13 जणांवर गुन्हा रजि. नं. 453/2023 भादंवि कलम 324, 323, 452, 143, 147, 148, 427, 504, 506 प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

श्रीरामपुरात जुगारी पकडले; काही प्रतिष्ठीतांचा समावेशसंगमनेरचे शासकीय विश्रामगृह बनले खासगी भोजनालय

- Advertisment -

ताज्या बातम्या