माजी नगरसेविकेच्या पतीची पालिका कर्मचार्‍यास मारहाण

jalgaon-digital
2 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला (Birth-death registration certificate) देताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणे दाखला देण्यासाठी अर्ज करायला सांगितल्याने एका माजी नगरसेविकाच्या पतीला (husband of a former corporator) राग आल्याने त्याने पालिका कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण (municipal employees Beating) करण्याचा प्रकार श्रीरामपूर पालिकेच्या (Shrirampur municipal) जन्म-मृत्यू विभागात घडल्याने पालिका कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध (Protest) करत काम बंद आंदोलन (Movement) केले.

याबाबत ज्यांना शिवीगाळ मारहाण (Beating) झाली त्या ज्ञानेश्वर चव्हाण या कर्मचार्‍याने सांगितले की, आज सकाळी रमजान शहा नावाची व्यक्ती दाखला घेण्यासाठी कार्यालयात आली असता दाखला लिहिताना स्पेलिंग चुकले होते. त्यामुळे आधारकार्डवर असणार्‍या स्पेलिंग प्रमाणे दाखला द्यावा, असे रमजान शहा यांचे म्हणणे होते. त्यामुळे कर्मचारी चव्हाण यांनी त्यासाठी रितसर अर्ज लिहून द्यावा, असे शहा यांना सांगितले. आपण रमजान शहा यांना ओळखत नसल्याने त्यांना अर्ज लिहून द्या म्हटल्याचा राग आला. त्यांनी मला त्याठिकाणी शिवीगाळ केली.

या घटनेनंतर पालिकेतील कर्मचारी एकत्र आले. त्यांनी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या घटनेचा सफाई कामगार संघटनेच्यावतीने नगरसेविका प्रणिती दीपक चव्हाण यांनी निषेध केला असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

उद्धट बोलल्याने राग आला- शहा

आधार कार्ड देऊन ही सून आणि मुलाचा दाखला चुकवला होता म्हणून मी आज दाखला दुरुस्तीसाठी पालिकेत गेलो होतो. त्यावेळी चव्हाण यांनी मला अर्ज करायला सांगितला. आधार कार्ड देऊन तुम्ही दाखल्यातील नाव चुकवले. त्यामुळे तुम्हीच दाखला दुरुस्त करून द्यावा, असे मी त्यांना म्हणालो तर त्यावर चव्हाण यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अर्ज लिहून दे नाहीतर काय करायचे ते कर अशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे मला राग आला. मी चांगले आणि सरळ बोला असे म्हणत असतानाही चव्हाण यांनी चुकीची भाषा वापरल्याने वादाचा प्रकार घडल्याचे रमजान शहा यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *