Thursday, April 25, 2024
Homeनगरकडाक्याच्या भांडणात पतीने केला पत्नीचा खून

कडाक्याच्या भांडणात पतीने केला पत्नीचा खून

उंबरे |वार्ताहर| Umbare

कामानिमित्त परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. त्यात संतापलेल्या पतीने पत्नीच्या (Husband wife) डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून (Murder) केल्याची घटना राहुरी तालुक्यातील (Rahuri) गुंजाळे (Gunjale) येथे काल गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी बाली बाळू निकम हीने वांबोरी (wambori) दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी पती डोंगरात जाऊन लपून बसला होता. त्याला पोलिसांनी (Police) स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने ताब्यात घेतले.

तक्रारीत म्हटले, मयत अलका वसंत शिंदे (वय 45) ही आपला पती वसंत लक्ष्मण शिंदे रा. गुंजाळे, ता. राहुरी (Rahuri) याच्याकडे मला मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे तालुका श्रीगोंदा (Shrigonda) येथे जायचे आहे. परंतु पती वसंत याने तिला तिकडे जाण्यास विरोध केला. त्यामुळे पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण (Quarrel) झाले. त्यात रागाच्या भरात त्याने अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार करून डोक्यात टणक वस्तुने जबर मारहाण (Beating) करण्यात आल्याने त्यात अलका हिचा जागेवरच मृत्यू (Death) झाला.

दरम्यान गुरुवारी सकाळी सात वाजता संशयित आरोपी वसंत याने मुलीला जाऊन सांगितले की, तुझी आई झोपलेली आहे, तिला जाऊन बघ, असे सांगून आरोपी डोंगराकडे पळत गेला. त्यानंतर आईचा मृत्यू (Mother death) झाल्याचे लक्षात येताच मयताची मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस (Wambori Police) दूरक्षेत्राशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागीय उपाधीक्षक संदीप मिटके (Shrirampur Divisional Deputy Superintendent Sandeep Mitke), राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Rahuri police inspector Nandkumar Dudhal), पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र डावखर, वांबोरीचे पोलीस हवालदार चंद्रकांत बराटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परीस्थितीची पाहणी केली व डोंगराच्या दिशेने पळून जाऊन लपून बसलेला संशयित आरोपीचा स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने शोध घेऊन ताब्यात घेतले व गुन्ह्याचा उलगडा झाला.

दरम्यान, मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयात (Vambori Rural Hospital) उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या