Friday, April 26, 2024
Homeनाशिकबंदुकीचा धाक दाखवून पती-पत्नीस मारहाण

बंदुकीचा धाक दाखवून पती-पत्नीस मारहाण

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील भारम येथे सहा जणांच्या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिक वाल्मिक गांजे व त्यांच्या पत्नीस मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सहा अज्ञातांविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सहा जणांच्या टोळक्याने वाल्मिक गांजे यांना आवाज देऊन बाहेर घराबाहेर बोलावले. लोखंडी दांड्याने त्यांची मारहाण करून त्यांना शिवीगाळ करू लागले.

आपल्या पतीला वाचविण्यासाठी मध्यस्थीसाठी गेलेल्या पत्नीलादेखील त्यांनी मारहान केली. या झटापटीत गांजे यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. गांजे यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मनमाड उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वल सिंह राजपूत आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या