Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशहवामान खात्याने दिला चक्रीवादळाचा इशारा; हाय अलर्ट जारी

हवामान खात्याने दिला चक्रीवादळाचा इशारा; हाय अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे गारा पडल्याचे पाहायला मिळात आहे. यासह पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

- Advertisement -

आता राज्यात एक नवं संकट उभं ठाकलं आहे. येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दक्षिण अरबी समुद्रात १५ मेच्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. १४ मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसंच १५ मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन पुढच्या दोन ते तीन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने याआधी मोसमी वाऱ्याबाबत अंदाज वर्तवला आहे. यंदा १ जूनला वेळेत मोसमी वारे भारतात पोहोचतील असा अंदाज व्यक्त केला होता. पावसाचा अंदाज वर्तवताना ९८ टक्के पाऊस होईल असंही हवामान विभागाने म्हटलं होतं. मोसमी वारे येण्यास अद्याप तीन आठवड्यांचा कालावधी आहे. यासाठी पोषक असं वातावरण अरबी समुद्रात तयार होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या