Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिकार्‍याचे जाळे तोडून काळविट शिरले लोकवस्तीत

शिकार्‍याचे जाळे तोडून काळविट शिरले लोकवस्तीत

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

काळविटाची शिकार करण्यासाठी शिकार्‍याने लावलेले जाळे तोडून काळवीट लोकवस्तीमध्ये घुसले. तेथे कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. यात जखमी काळविटाला भाऊराव रुपनर, आप्पा रुपनर, माऊली रुपनर, योगेश रुपनर, गोवर्धन रुपनर यांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडविले व वन विभागाच्या कर्मचार्‍याच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

दरम्यान, जखमी काळविटावर उपचार करण्यात आले असून मोहोजदेवढे, रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी व बहीरवाडी या चार वाड्यांच्या कार्यक्षेत्रामधे वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. डोंगराळ भाग असल्याने काही शिकारी डोंगर परीसरात जोळे लावून काळवीट व हरणाची शिकार करीत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत. वन विभागाच्या कर्मचार्‍यांना माहीती देवूनही ते शिकार्‍यांवर करावाई केली जात नाही, असा आरोप माजी सरपंच गणेश चितळकर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

शनिवारी एक काळवीट रुपनरवाडी परीसरात लोकवस्तीमधे आले. त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला. ते जखमी झाले. नागरीकांनी कुत्र्याला बाजुला करुन त्याच्या जीव वाचविला. मात्र यावेळी काळवीटाच्या पायात शिकार्‍याने लावलेले जाळे अथवा काहीतरी अडकलेले होते.वन विभागाचे कर्मचारी इंद्रभान चितळे यांच्या ताब्यात हे काळवीट माजी सरपंच गणेश चितळकर, रामकिसन चितळकर, रमेश चितळकर, दादासाहेब चितळकर, रामदास दिंडे यांनी दिले.

आम्ही जखमी काळवीटाबाबतची माहिती वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिल्यानंतर त्यांनी काळवीट सोडून देण्याचा सल्ला दिला. ते जखमी असल्याने उपचार होणे गरजेचे होते. वन कर्मचारी शिकार्‍यावर कारवाई करीत नाहीत. वनविभागाच्या विरोधात अंदोल करणार आहे.

– गणेश चितळकर, माजी सरपंच मोहोजदेवढे.

आम्ही जखमी काळवीट ताब्यात घेतले. त्याच्यावर उपचार केले आहेत. शिकार्‍याचा काही विषय नाही. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याने त्या भागात गस्त वाढवू. लोक सांगतात मात्र प्रत्यक्षात शिकारी सोपडत नाही. या भागात वन्यजीव भरपुर प्रमाणात आढळतात. ग्रामस्थांनीही मदतीची भावना ठेवावी आम्ही शिकार्‍यांवर नजर ठेवून आहोत.

– वर्षा गिते, वनरक्षक मोहोजदेवढे.

- Advertisment -

ताज्या बातम्या