Friday, April 26, 2024
Homeनाशिकभ्रष्टाचार चौकशीसाठी उपोषणाचा इशारा

भ्रष्टाचार चौकशीसाठी उपोषणाचा इशारा

सटाणा । प्रतिनिधी | Satana

तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायत (gram panchayat) सरपंच (sarpancha) व ग्रामसेवक (gram sevak) यांनी केलेल्या

- Advertisement -

कथित रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी (Corruption) तालुका बाहेरील वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी अन्यथा 17 ऑक्टोबरपासून पंचायत समिती (panchayat samiti) कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण (gunger strike) केले जाईल, असा इशारा प्रकाश देवरे, पंकज कापडणीस व गोरख देवरे यांनी दिला आहे.

भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच पूनम सूर्यवंशी व ग्रामसेवक निसार शेख यांनी ग्रामपंचायतच्या विविध विकासकामांच्या निधीत (fund) लाखो रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केल्याची प्रकाश देवरे व इतरांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे (Chief Executive Officer of Zilla Parishad) केलेली होती. त्या अनुषंगाने बागलाण पंचायत समितीच्या (Baglan Panchayat Samiti) गटविकास अधिकार्‍यांनी चौकशी करावी असे आदेश देण्यात आले होते.

मात्र दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांसाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त खाते असल्याने सदर कथित भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी केली जाणार नाही, असा तक्रारकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात तात्काळ तालुक्याच्या बाहेरील वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अन्यथा 17 ऑक्टोबरपासून पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या