Friday, April 26, 2024
Homeनाशिकआदिवासी भागात मानव विकास शिबिरे ठरतात वरदान

आदिवासी भागात मानव विकास शिबिरे ठरतात वरदान

कोहोर | Kohor

जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जोगमोडी यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यात आरोग्य विभागामार्फत गरोदर आणि शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकासाठी राबविण्यात येत असलेला मानव विकास कार्यक्रम नुकताच जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रारंभ करण्यात आला. गत चार ते पाच महिन्यापासून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला मानव विकास कार्यक्रम सुरु करण्यात आल्याने, आदिवासी महिलासाठी संजीवनी ठरत आहे.

- Advertisement -

सन २०२०-२०२१ या वार्षिक आराखड्यानुसार राज्य स्तरावर या कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियत्रण आयुक्त मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद हे करत असून त्या – त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात.

राज्यातील २२ अतिमागास जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता १२५ तालुक्यात मानव विकास शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचे संनियत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी हे करीत आहेत.

या शिबिरामध्ये गर्भवती महिला, शून्य ते सहा महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा माता यांची स्रीरोग तज्ञाकडून तपासणी करण्यात येते. तसेच सहा महिने ते दोन वर्ष वयोगटातील बालकांची बालरोग तज्ञाकडून तपासणी करून औषधोपचार करण्यात येतो. अ.जाती, अ. जमाती व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मंजुरापोटी रुपये चार हजार दोन टप्यात देण्यात येते.

जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लॉंक डाऊन नंतर प्रथमच या महिन्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आले. या शिबिरात २९ गरोदर माता, २ स्तनदा माता आणि दोन बालकांनी लाभ घेतला.

या शिबिराच्यावेळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, आरोग्य सहाय्यक राजेंद्र तवर, श्री. दरोडे, सहायिका गांगोडा, आरोग्य कर्मचारी राजेंद्र गवळी, संदीप वाघेरे, किशोर आयनोर, के.पी. ठाकरे, तसेच औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेविका, आशा सेविका, आशा गतप्रर्तक व लाभार्थी उपस्थित होते.

मानव विकास शिबिरे आदिवासी व दुर्गम भागात गरोदर महिलासाठी राबविण्यात येत आहे. दुसऱ्या गरोदरपणात असणाऱ्या मातेला ९ व्या महिन्यात रुपये २००० व प्रसूती नंतर रुपये २००० बुडीत मंजुरी देण्यात येते. या शिबिरासाठी गरोदर मातेसह स्तनदा मातेनीही लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

-डॉ.राजेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ.केंद्र जोगमोडी, ता.पेठ.

- Advertisment -

ताज्या बातम्या