Sunday, April 28, 2024
Homeनाशिकनाशकात प्रारूप मतदार याद्यांचा गोंधळात गोंधळ

नाशकात प्रारूप मतदार याद्यांचा गोंधळात गोंधळ

पंचवटी | वार्ताहर Panchvati

नाशिक महानगरपालिकेने (NMC) नुकत्याच महानगरपालिका निवडणूक 2022 (NMC Election 2022) च्या प्रारूप याद्या प्रभाग निहाय प्रसिद्ध केलेल्या असून त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झालेला असून प्रभाग क्रमांक सात मधील प्रारूप यादी बनवताना प्रभागातील काही भागात मनपा कर्मचारी हे गेलेच नाही.

- Advertisement -

त्यामुळे खालील प्रमाणे परिसरातील मतदारांची नावे विधानसभा यादीत असूनही महानगरपालिकेच्या(NMC) प्रारुप यादीमध्ये त्याचा समावेश झालेला नाही. किंवा ती नावे भौगोलिक दृष्ट्या प्रभाग क्रमांक सात मध्ये असताना प्रभाग क्रमांक एक दोन व पाच मध्ये टाकण्यात आलेली आहे. अशा तक्रारी भारतीय जनता पक्षाच्या उत्तमराव उगले (bjp leader uttamrao ugale) केल्या आहेत….

प्रभाग क्रमांक सात मधील पांडुरंग कॉलनी, पवार मळा संपूर्ण परिसर ,सूर्या पार्क परिसर, अश्वमेध नगर पूर्ण परिसर , गजवक्र नगर ,गजानन चौक परिसर, गणेश कॉलनी, पवार मळा, अप्पा पवार परिसर, ओम नगर, रुद्राक्ष पॅलेस परिसर, कृष्णनगर ,सप्तरंग सोसायटी परिसर ,राजमुद्रा परिसर, सप्तरंग सोसायटी, शारदा हॉस्पिटल परिसर, काकड मळा ,शरदचंद्र शरद चंद्र मार्केट परिसर, नको चॅरिटेबल ट्रस्ट, गणेश मंदिर ,कौशल्य मंगल कार्यालय परिसर, या परिसरातील जवळजवळ 5000 नावे ही काही प्रभाग एक नंबर मध्ये व काही प्रभाग दोन मध्ये टाकण्यात आलेली आहेत.

या परिसरात फक्त पाचशे नावांचा समावेश आहे. याचा अर्थ कर्मचार्‍यांनी घरात बसून प्रभाग क्रमांक सात मधील यादी तयार केली आहे असे नागरीकांना दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग सात मधील पाटावरील झोपडपट्टी मधील नावे ही पूर्णतः गायब झाली असून त्यामधील काही नावे प्रभाग क्रमांक पाच मध्ये टाकण्यात आलेली आहे.

तसेच प्रभाग क्रमांक सात मधील समर्थ नगर, विठाई नगर, करण नगर, गोकुळधाम परिसर, हमालवाडी, तुळजाभवानीनगर या भागातील फक्त 20 टक्के नावे टाकण्यात आलेली आहे. बाकीचे नावे कुठे गेली आहेत याचा देखील तपास लागत नाही.

अशाप्रकारे प्रभाग क्रमांक सात मधील यादीमध्ये प्रचंड प्रमाणात नावे नसल्याने या प्रभागाची प्रारूप यादी तयार करण्याकरता पुन्हा कर्मचार्‍यांची नेमणूक व्हावी अशी विनंती प्रभाग नंबर सात मधील इच्छुक उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांनी केली आहे.

घोळात घोळ याद्यांचा

प्रभाग क्रमांक सात मधील 5000 मतदारांची नावे ही प्रभाग नंबर एक मध्ये व प्रभाग क्रमांक दोन मध्ये व प्रभाग नंबर पाच मध्ये मध्ये समाविष्ट झालेली आहेत त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे

नंबर 6 मधील बूथ नंबर 45 हा सध्याचे प्रभाग प्रभाग नंबर 7 मध्ये समाविष्ट असला पाहिजे परंतु नंबर 45 मधील सर्व मतदारांची नावे ही आत्ताचे नवीन प्रभाग नंबर एक मध्ये टाकण्यात आलेली आहेत.

तसेच पूर्वीचा प्रभाग क्रमांक सहा मधील बूथ नंबर 29 ते 44 व 46 या भूत मधील नावे ही प्रभाग नंबर 1 मध्ये टाकण्यात आलेली आहे. वास्तविक नंबर 29 ते 44 व 46 ही नावे आत्ताची प्रभाग नंबर 7 मध्ये समाविष्ट व्हावयास पाहिजे.

तसेच आत्ताचे प्रभाग क्रमांक सात यामधील पाटाजवळील फुलेनगर मधील बूथ क्रमांक 77 76 82 यामधील 500 मतदारांची नावे ही प्रभाग नंबर पाच मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे ती नावे प्रभाग नंबर सात मध्ये समाविष्ट करण्यात यावी.

अशाप्रकारे प्रभाग क्रमांक सात मधील पाच हजार मतदारांची नावे ही प्रभाग नंबर एक,दोन, व पांच मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ती प्रभाग क्रमांक सात मध्ये समाविष्ट करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या