Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याHSC Results 2023 : प्रतीक्षा संपली! आज बारावीचा निकाल

HSC Results 2023 : प्रतीक्षा संपली! आज बारावीचा निकाल

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज( दि.25 मे ) रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून असलेली निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

- Advertisement -

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिन्यातून एकदा पाणीपुरवठा

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्याल्यांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या संकेतस्थळांवर पहा निकाल

1. mahresult.nic.in

2. https://hsc.mahresults.org.in

3. http://hscresult.mkcl.org

- Advertisment -

ताज्या बातम्या