Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयगृहनिर्माण, बाजार समित्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ ?

गृहनिर्माण, बाजार समित्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ 15 सप्टेंबरला संपली आहे. यामुळे सहकार निवडणुक प्राधिकारण यांच्याकडून पुन्हा दोन किंवा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती सहकारी विभागाच्या सुत्रांनी दिली.

राज्यात दीड लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहे. त्यांच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असते. 2019 मध्ये मुदत संपलेल्या 13 हजार 43 संस्था होत्या.

त्यांची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केली होती. मात्र मार्चपासून करोना संसर्गाला सुरूवात झाली व या निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जानेवारी 2020 पासून मागील 6 महिन्यात 31 हजार 394 संस्थांची मुदत संपली आहे.

त्यांनाही करोनामुळेच मुदतवाढ मिळाली. ही मूदत 15 सप्टेंबरला पूर्ण होत आहे. करोना प्रादुर्भाव दरम्यानच्या काळात कमी होण्याऐवजी वाढलाच आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून पुन्हा मुदतवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. किमान 2 किंवा 3 महिने मुदतवाढ दिली जाईल, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील कृषी ऊत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकाही याच कारणामुळे पुढे ढकलण्यात येणार आहेत. 2019 मध्ये 52 व या वर्षातील अशा एकूण 180 समित्यांची मुदत संपली असून त्यांची निवडणूक प्रलंबित आहे. सभासद संख्या 250 पेक्षा कमी असेल तर अशा संस्था स्वतःच त्यांची निवडणूक घेऊ शकतात. मात्र या संस्थांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येत आहे. त्याला आता वर्ष होऊन गेले, मात्र नियमावली झाली नाही. त्यामुळे या संस्थांच्याही निवडणुका प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या ब वर्गातील 888 संस्था असून यात सप्टेंंबरअखेर 750 संस्था आहेत. क वर्गाच्या 551 संस्था असून सप्टेंबरअखेर मुदत संपणार्‍या संस्थांची संख्या 480 आहे. तर ड वर्गातील 246 संस्था असून यात सप्टेंबरअखेर मुदत संपणार्‍या संस्थांची संख्या 166 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या