Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारबोरद येथे वीज पडून घराचे नुकसान

बोरद येथे वीज पडून घराचे नुकसान

बोरद | वार्ताहर- BORAD

बोरद (Bored) येथे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक पाऊस (rain) सुरू झाला. कुंभार गल्लीत (Potter’s Lane) एका लिंबाच्या झाडावर (tree) वीज कोसळली (lightning). त्यामुळे लिंबाच्या झाडाच्या फांद्या (Tree branches) घराच्या छतावर (House damaged) आदळल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

- Advertisement -

आज दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पावसालाही सुरुवात झाली. अशा परिस्थितीत कुंभार गल्लीतील रवींद्र राजपूत, संदीप राजपूत, तुळशीराम कुंभार, मिलिंद पाटील, लाला कुंभार हे आपल्या घराच्या ओट्यावर उभे राहून पावसाची गंमत बघत होते.

अशावेळेस आकाशातून जोराचा आवाज झाला आणि एक वीज अचानक समोरच्या घराशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर कोसळली. त्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून या फांद्या राजेंद्र रमण कुंभार यांच्या घराच्या छतावर जाऊन आदळल्या.

सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र फांद्या मोठ्या असल्याने आणि घरातील छत हे पत्र्याचे असल्याने या फांद्या पत्र्यावर जाऊन जोरात आदळल्या. त्यामुळे घराच्या भिंतींना तडा गेला आहे.

यावेळी प्रत्यक्षदर्शी मिलिंद पाटील यांनी सांगितले की त्यांनी वीज पडताना त्या ठिकाणी पाहिली, जोरात वीज कडाडली आणि क्षणाचाही विलंब न होता अचानक लिंबाच्या झाडावर कोसळली. त्या ठिकाणी झाडाच्या फांद्यांचा जोरात आवाज झाला आणि त्या फांद्याशेजारी असलेल्या घराच्या छतावर येऊन आदळल्या.

यावेळी घरात असलेले रमण कुंभार तसेच त्यांचे परिवार बाहेर कसला आवाज झाला आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर निघाले तो त्या ठिकाणी बघणार्‍यांची बरीच गर्दी जमली होती. त्यावेळी लिंबाच्या झाडावर वीज कोसळून फांद्या छतावर कोसळल्याचे दिसून आले. त्यामुळे घराच्या भिंतींना तडे गेले. मात्र घरात असताना त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या