Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधस्वयंपाककला

स्वयंपाककला

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

सकारात्मक वातावरणात मुलांचे चांगल्याप्रकारे शिक्षण कसे होईल हा विचार आपण जबाबदारीने करत आहोत. त्याचे पुढील जीवन सफल होण्यासाठी आपण पालक डोळ्यांत तेल घालून त्यांची काळजी घेतो. आज आपण सखोलतेने विचार करत आहोत हॉटेल मॅनेजमेंट या पदवीचा. या पदवीचा उपयोग चांगला होतो, अगदी घरसंसारापासून मोठ्या व्यवसायापर्यंत. हॉटेल मॅनेजमेंट हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीनंतर करता येतो. येथेही एन्ट्रन्स परीक्षा घेतली जाते व ती उत्तीर्ण होणे गरजेचे असते. कॅामर्स, सायन्स व आर्टस् या सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांना हा कोर्स करून हॅाटेल मॅनेजमेंट ही पदवी मिळवता येते. एकदा पदवी मिळाल्यानंतर नोकरीसाठी चांगले पर्याय उपलब्ध असतात. कोणत्याही नोकरीचे यश आपण करत असलेल्या व्यवस्थित कामात असते. प्रत्येक गरजू या संधीचे सोने करतो व त्याचे आयुष्य सुखकर होते. मन लावून जबाबदारीने काम केले तर नक्कीच यश सहजपणे मिळते व चांगला जम बसतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीचा टप्पा अर्थातच महत्त्वाचा असतो. ज्या ध्येयाने मुले शिक्षण घेतात त्यातील यशाप्रमाणे त्यांना नोकरी मिळते. स्वयंपाक हीसुद्धा एक कला आहे. ही कला आत्मसात केल्यावर आयुष्यभर आपल्याला उपयोग होतो. ती कला असली तरी ती अवघड आहे कारण हा अभ्यास फक्त पेपर लिहून नाही करता येत तर प्रत्यक्षात कृती करावी लागते व त्यासाठी प्रयत्नांची शिकस्तही लागते. आजच्या पर्यटनाच्या युगात तर या व्यवसायाला खूप चांगले दिवस आले आहेत. प्रवाशांना घरापासून दूर आल्यानंतर त्यांची सेवा उत्कृष्ट होणे गरजेचे असते, कारण त्यांनी त्यासाठी पैसे भरलेले असतात. या पदवीच्या आधारावर व त्यातील अनुभवामुळे अनेकांनी आपले स्वतःचेच व्यवसाय यशस्वीपणे चालू करून चांगले यश प्राप्त केले आहे. त्यापासून

- Advertisment -

ताज्या बातम्या