Thursday, April 25, 2024
Homeनगरवसतीगृहांच्या सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही

वसतीगृहांच्या सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत अतिशय सोयी-सुविधांनी युक्त झाली आहे. पुढील काळात वसतिगृहांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी येथे केले.

- Advertisement -

कर्जत येथे सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृहाची नवीन इमारत, सिद्धार्थ बोर्डिंग या अनुदानित वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण तसेच विशेष मोहीमेतील लाभार्थीं यांना लाभ मंजूरी आदेश वाटप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय पवार, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अहमदनगर समाजकल्याण विभागाच्या योजनांची दूरदृष्टताफ या पुस्तिकेचे प्रकाशन ही सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ना. मुंडे म्हणाले, कर्जत येथे तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीने प्रस्ताव तयार करावा. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सदर प्रस्तावास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

अशा आहेत सुविधा

सुमारे 9 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात 100 मुलींच्या निवास व भोजनाची व्यवस्था होणार आहे.सोयी-सुविधांनी युक्त अशा इमारतीत विद्यार्थीनी निवास, भोजन कक्ष, कार्यालय, भांडार कक्ष, संगणक कक्ष, वाचनालय, अधीक्षक निवास अशा 27 खोल्या बांधण्यात आले आहेत. प्रत्येक खोलीत 4 मुलींच्या निवास बेड आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या