Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकएकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक । Nashik

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (Integrated Tribal Development Project) कार्यालयांतर्गत आदिवासी मुला मुलींसाठी (tribal boys and girls) ३२ वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी २०२२-२३ शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (Assistant Collector and Project Officer) वर्षा मीना (Varsha Meena) यांनी केले आहे…

- Advertisement -

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार,राज्यात विभागीय,जिल्हा (state and divisional) तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विभागाद्वारे शासकीय वसतिगृह ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता ८ वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या तसेच विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता ११ वी पासून पुढे शिक्षण (Education) घेणाऱ्या नवीन व जुन्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय वसतिगृहात (Government Hostel) प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करतांना संकेतस्थळावर दिलेले वापरकर्ता मार्गदर्शिकेचे (User Mannual) काळजीपूर्वक वाचनकरून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

तर नवीन विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज भरतांना प्रथम नोंदणीकरून प्राप्त युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने Hostel Admission मधील New Admission हा पर्याय काळजीपूर्वक निवडून अर्ज सादर करावा. तसेच जे विद्यार्थी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुने प्रवेशित आहेत, अशा विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात देखीलअर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी Hostel Admission मधील Renew Hostel Admission हा पर्याय काळजीपूर्वक निवडून अर्ज सादर करावा. जुन्या विद्यार्थ्यांनी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाच्या होम पेजवर FORGOT PASSWORD पर्यायाची निवड करून त्यात आवश्यक माहिती भरून पासवर्ड रिसेट करून घ्यावा, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी कळविले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या इयत्तेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यामागील वर्षी मिळालेली गुणपत्रिका, क्रमांकासहित जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा टिसी, शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, चालु वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड, प्रवेश पावती, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती व इतर आवश्यक कागदपत्रे

- Advertisment -

ताज्या बातम्या