Thursday, April 25, 2024
Homeनगरग्रामीण भागात साथीचे आजार वाढू लागल्यामुळे दवाखाने फुल्ल

ग्रामीण भागात साथीचे आजार वाढू लागल्यामुळे दवाखाने फुल्ल

राजुरी (वार्ताहर)

ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे सध्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये जंतू तयार होऊन अनेक गावांमध्ये सध्या साथीच्या आजाराचे थैमान घातले आहे. त्यामुळे दवाखाने फुल्ल झाले आहे.

- Advertisement -

या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीला उपाययोजना करण्यासाठी सूचना देणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. राहाता तालुक्यातील राजुरी परिसरात साथीचे आजार पसरले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले दिसत आहे. यावर उपाय योजना करणे सध्या तरी गरजेचे बनले आहे.

करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशातच नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागू शकतो. यासाठी पंचायत समिती प्रशासनाने योग्य उपाय योजना कराव्यात. तसेच स्थानिक ग्रामपंचायती यांनाही संपर्क करून ज्या गावांमध्ये साथीचे रोग सुरू झाले आहेत अशा गावांमध्ये तणनाशक, जंतनाशक व धूर फवारणी करावी. जेणेकरुन साथीच्या आजार पसरणार नाही.

नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता ठेवून घाण कचरा योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच घरासमोर असणार्‍या पाण्याची टाकी स्वच्छ धुऊन व नंतर त्यामध्ये पाणी साचून ठेवणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या परिसरात डास पसरणार नाही.

मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे अनेक आजार वाढवू लागले असल्यामुळे ग्रामीण भागातील दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामध्ये डोके दुखणे, हातपाय दुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे, गोचीड ताप, चिकनगुनिया यासारख्या आजारामुळे सध्या नागरिक त्रस्त झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या