Friday, April 26, 2024
Homeजळगावउपचारादरम्यान बाळ दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड

उपचारादरम्यान बाळ दगावल्याने रुग्णालयाची तोडफोड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

न्युमोनिया (neumonia) झालेल्या दोन महिन्याच्या बाळाला (baby) झटके येत असल्याने त्याच्यावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात (District Medical Hospital) उपचार (Treatment begins) सुरु होते. उपचारादम्यान, बाळाचा मृत्यू (death)झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी (relatives)गोंधळ घालित परिचारिका (nurse Room vandalism) कक्षाची तोडफोड करून औषधांचे रॅक फेकून नुकसान केल्याची घटना मंगळवारी 23 मे रेाजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. तसेच रुग्णालयीन कागदपत्रांची कार्यवाही न करता मयत बालकाला घेऊन पसार झाले. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

- Advertisement -

चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेले विजय कोळी यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला सोनल हिला दि. 22 मे रोजी संध्याकाळी प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल केले होते. दरम्यान रुग्णाची प्रकृती खूप गंभीर होती. रुग्णाला न्युमोनिया आणि झटके येत होते.

याबाबतची कल्पना बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णाला 14 नंबर आयसीयू विभागात भरतीदेखील केले. रुग्णाला व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले. मंगळवार 23 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बालकाचा मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कळविले. दरम्यान, नातेवाईकांनीच डॉक्टरांवर व परिचारिकांवर संताप व्यक्त केला. शिविगाळ करून त्यांनी औषधे ठेवलेला रॅक जोरात फेकून दिला. त्यामुळे औषधींचे नुकसान झाले.

परिचारीका कक्षाची केली तोडफोड

बाळाच्या नातेईकांनी परिचारिका कक्षाजवळ जात त्यांनी कक्षाचा काच फोडला. त्यामुळे कक्षामध्ये काचांचा खच पडला. परिचारिका व डॉक्टर समजावीत असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याच वेळेला रुग्णाच्या महिला नातेवाईकांनी मयत बाळाला घेऊन बाहेर पोबारा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या