Thursday, April 25, 2024
Homeनगर'या' तालुक्यात परवानगी न घेता घोडाबैल शर्यत भरविली

‘या’ तालुक्यात परवानगी न घेता घोडाबैल शर्यत भरविली

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालूक्यातील तमनर आखाडा येथे मळगंगा देवी यात्रे (Malganga Devi Yatra) निमित्त परवानगी न घेता घोडा बैल शर्यत (Horse Bull Race) भरविण्यात आली होती. पोलीस पथकाला खबर मिळताच त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली. घोडा बैल शर्यत भरवणार्‍या तीन जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

सिनेअभिनेत्री जुही चावला हिने घेतले शनीदर्शन

राहुरी (Rahuri) तालूक्यातील तमनर आखाडा येथे 30 मार्च रोजी मळगंगा देवीचा यात्रा उत्सव होता. या यात्रा उत्सवात काही जणांनी परवानगी न घेता घोडाबैल शर्यत (Horse Bull Race) भरवीली होती. या घटनेची खबर पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने तमनर आखाडा येथे जाऊन शर्यत भरवीण्यास मज्जाव केला. तेथे प्रचंड गर्दी असल्याने पोलीस पथकाचे न ऐकता शर्यत भरवण्यात आली. त्या ठिकाणी तीस ते चाळीस बैलगाडा धारकांच्या मदतीने घोडे, बैलगाडा हारजित ची शर्यत लावून गाड्यांना जुंपलेले घोडे (Horse) व बैल (Bull) अधिक वेगाने पळावे, याकरीता त्यांना चाबकाने क्रुरपणे मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले. कोणतीही परवानगी न घेता घोडा बैलाची हारजीत ची शर्यत भरवून प्राण्यांचा छळ करण्यात आला.

एसटी व दुचाकीचा अपघात, एक जखमी

या प्रकरणी पोलिस नाईक दादासाहेब दत्तात्रय रोहकले यांच्या फिर्यादीवरून दिलीप पंढरीनाथ तमनर, अशोक हरिभाऊ तमनर, बापू रघुनाथ तमनर तिघे रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. 344/2023 भादंवि कलम 188 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

पोलीस भरती लेखी परीक्षेला 825 उमेदवारांची दांडी!

- Advertisment -

ताज्या बातम्या