Saturday, April 27, 2024
Homeनगरसावेडीतील हुक्का पार्लरवर कारवाई

सावेडीतील हुक्का पार्लरवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील पारिजात चौकात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करत दोन हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी आनंद सर्जेराव मिसाळ (वय 22 रा. सुडके मळा, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरूवारी पारिजात चौकात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक गडकरी यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार पथकाने कारवाई करत दोन हजार रुपयांचे हुक्का पिण्यासाठीचे पॉट, 100 रुपयांचे निळ्या रंगाचे पाईप आणि 400 रुपयांचे हुक्क्याचे फ्लेवर असा दोन हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार वसीम पठाण, अहमद इनामदार, संदीप गिर्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या