Sunday, April 28, 2024
Homeनाशिकशिक्षकांना मानधन देण्याचे वावडे आहे काय?

शिक्षकांना मानधन देण्याचे वावडे आहे काय?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.हा कार्यक्रम राबविताना निवडणूक शाखेला मतदान सेवक म्हणुन काम करणार्‍या शिक्षकांना मानधन देण्याचे वावडे आहे काय ?असा सवाल नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 565 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यासाठी काही हजार शिक्षक सेवक महसूल विभागाने वापरले. एकुण तीन दिवसांचे या सेवक वर्गाचे मानधन लाखो रुपयात होते. मात्र,चांदवड आणि सटाणा वगळता इतर ठिकाणी मानधन वितरीत करण्यास प्रशासनाने ठेंगाच दाखविला आहे. येथेही मानधन अदा करण्यात तफावत आहे.

काही तालुक्यात सलग तीन वेळा शिक्षकांची नेमणुक करुन घेतली. मात्र, अदयाप मानधन वाटप झालेले नाही. ही बाब गंभीर आहे. लाखो रुपये मानधन मिळणार की नाही? अशी शंका शिक्षक वर्गाची आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सखोल चौकशी करुन थकित आणि चालु असे सर्व मानधन वितरीत करावे,अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

लोकसभा,विधानसभा निवडणुकीचे मानधन हे दुपारपावेतो मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष यांच्याकडे रोख स्वरुपात येते .मात्र, ग्रामपंचायतीसाठी दोनदा तीनदा बॅकेचे खात्याची माहिती खातेपुस्तिकेची प्रत जमा केली जाते. मात्र, मानधन मिळत नाही, अशी जिल्हाभरातुन तक्रार आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घ्यावी, अशी मागणी कैलास देवरे, चंद्रकांत कुशारे, एस.बी.देशमुख, मोहन चकोर, संजय गिते, बाळासाहेब देवरे, महेश अहिरे, बी.एस. सानप यांनी माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या