Thursday, April 25, 2024
Homeनगरहनीट्रॅप : सराईत गुन्हेगार बागले जेरबंद

हनीट्रॅप : सराईत गुन्हेगार बागले जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅप प्रकरणातील पसार आरोपी महेश बागले (रा. नालेगाव, नगर) याला तालुका पोलिसांनी शहाडोंगर (ता. नगर) परिसरात अटक केली. बागले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. एका क्लासवन अधिकार्‍याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी जखणगाव येथील तरुणीसह तिच्या चार साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

जखणगाव येथील एका तरुणीने तिच्या पंटरच्या मदतीने सुरूवातीला नगर तालुक्यातील एका बागतदाराला हनीट्रॅपमध्ये अडकविले होते. यानंतर नगरमधील एक क्लासवन अधिकारी या हनीट्रॅपचा शिकार झाला. त्याने पुढे येत फिर्याद दिली. आरोपी तरुणीने सदर अधिकार्‍यास जखणगाव येथील बंगल्यात बोलावून घेत नाजूक संबंध करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते.

अधिकार्‍याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तरुणीसह तिचे साथीदार सचिन खेसे, अमोल मोरे, महेश बागले व सागर खरमाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीसह सचिन खेसे, अमोल मोरे यांना यापूर्वी अटक केली आहे. रविवारी महेश बागले याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस कर्मचारी सोनवणे, मरकड, बोराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पोलिसाचा भाऊ खरमाळे पसारच

नगरमधील क्लासवन अधिकार्‍याला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेला आरोपी सागर खरमाळे हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका पोलीस कर्मचार्‍याचा भाऊ आहे. गुन्हा दाखल होताच खरमाळे पसार झाला. त्याला अटक करण्यात अद्याप तालुका पोलिसांना यश आले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या