Friday, April 26, 2024
Homeनगरकर्मचार्‍यांचा प्रामाणिकपणा, बँकेत विसलेली तीस हजारांची रक्कम केली परत

कर्मचार्‍यांचा प्रामाणिकपणा, बँकेत विसलेली तीस हजारांची रक्कम केली परत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

समता पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत सुनीता दुगल एम.एस.सी.बी.चे वीज बील भरण्यासाठी शाखेत आल्या असता त्याच्याजवळ असणारी 30 हजारांची रक्कम विसरून शाखेतच राहिली. श्रीरामपूर शाखेच्या शिपाई कर्मचारी रंजना लोंढे यांना ती रक्कम सापडली. त्यांनी ती रक्कम शाखाधिकारी फारुख शेख यांच्याकडे दिली.

- Advertisement -

त्यांनी चौकशी करून ती रक्कम सुनीता दुगल यांना बोलावून देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सोपान पठारे,उपशाखाधिकारी भरत कर्णावट ,कर्मचारी ग्राहक, सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे व संचालक मंडळ, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी, अधिकारी आदींनी सौ रंजना लोंढे व सर्वच कर्मचार्‍यांचे कौतुक करत शाबासकी दिली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेची गेली अनेक वर्षांपासून मी ग्राहक असून समतात ग्राहकाला त्वरीत मिळणारी सेवा आणि समताचे अध्यक्ष काका कोयटे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सेवा देणारे सर्वच कर्मचारी कौतुकास पात्र असून त्यांच्यातील शिस्त आणि अंगी असलेल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आज अनुभवातून मिळाला आहे.

– सुनीता श्रीराम दुगल

- Advertisment -

ताज्या बातम्या