Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरहोमगार्डच्या साप्ताहिक कवायती लवकरच होणार पुर्ववत सुरु

होमगार्डच्या साप्ताहिक कवायती लवकरच होणार पुर्ववत सुरु

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa Budruk

होमगार्डच्या साप्ताहिक कवायती (Homeguard Weekly Exercises) लवकरच सुरू होणार आहेत. या संदर्भातील आदेश महासमादेशक कार्यालय, मुंबई (Mumbai) यांनी सर्व जिल्हा समादेशक यांना दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा समादेशक यांनी तालुका होमगार्ड पथकांना (Homeguard Squad) साप्ताहिक कवायती (Weekly Exercises) आयोजनाबाबत पत्र दिल्याने गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या कवायती पुन्हा सुरू होणार असल्याने होमगार्ड जवानांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

ज्या होमगार्ड (Homeguard) जवानांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण झाले आहे अशाच होमगार्डचा साप्ताहिक कवायतींमध्ये समावेश केला जाणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी दुपारी तीन वाजता या साप्ताहिक कवायतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

होमगार्ड जवानांना प्रति कवायत 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये एकूण 369 होमगार्ड युनिट्स आहेत. त्यामध्ये एकूण 44 हजार 787 होमगार्ड जवान निष्काम सेवेत ‘अच्छे दिना’च्या प्रतीक्षेत कार्यरत आहेत.

होमगार्ड संघटना ही स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच 6 डिसेंबर 1946 रोजी स्थापना झालेली आहे. संघटनेने आपले अमृतमहोत्सवी वर्ष ओलांडले, तरी होमगार्ड जवानांना आपल्या न्याय हक्कासाठी आजही लढा देत आहे.

यामध्ये अहमदनगरचे दत्तात्रय माळी, नाशिकचे नितीन गुणवंत, सोलापूरचे योगेश कोळी यांनी संघटनेत राहून आपल्या आंदोलनाची धग शासनास दाखवली होती. होमगार्डच्या वतीने विविध संघटना संघर्षरत आहेत. त्यामध्ये रामलिंग पुराणे यांच्या बसव प्रतिष्ठानचेही कार्य मोलाचे आहे. त्यांच्याच आंदोलनाची दखल घेऊन नुकतेच शासनाने वय वर्ष 50 च्या पुढील होमगार्ड जवानांना बंदोबस्तही सुरू केलेला आहे. तसेच होमगार्ड मानसेवी अधिकार्‍यांच्या रद्द केलेल्या नियुक्त्याही पूर्ववत केलेल्या आहेत. आता होमगार्ड जवानांच्या कवायती सुरू करून सरकार होमगार्डबद्दल सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

होमगार्ड जवानांच्या न्याय हक्कांविषयी लोकशाही मार्गाने आंदोलने केल्याने अनेक जवानांना होमगार्ड कार्यालयाने निलंबन करून घरचा रस्ता दाखवल्याने अशा निलंबित, अपात्र ठरवलेल्या होमगार्ड जवानांची संख्याही मोठी आहे. सरकार लवकरच त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा होमगार्ड जवानांना आहे.

होमगार्ड जवानांना महिन्याच्या पहिल्या शनिवारी व तिसर्‍या शनिवारी पोलीस ठाण्याच्या परिसरा जवळ साप्ताहिक कवायत करावी लागणार आहे या साठी एका पोलीस कर्मचार्‍यांची देखील नेमणूक करण्यात येणार आहे तसेच पोलीस दैनंदिन डायरीमध्ये देखील त्या दिवशी स्वाक्षरी करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या