Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकनाशकातील 'या' प्रभागात मिळतेय घरपोच लसीकरण

नाशकातील ‘या’ प्रभागात मिळतेय घरपोच लसीकरण

नाशिक । Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असून यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांना घरपोच लसीकरण करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवसेना गटनेते विलास शिंदे व नाशिकचे सह्याद्री हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक शहरातील हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी होणारी गर्दी, लस घेण्यासाठी नोंदणी करूनही स्लॉट न मिळणे, खाजगी हॉस्पिटलला जाऊन लास घेणे अशी परिस्थिती संशय नाशिक शहरात पाहायला मिळते आहे. यामुळे प्रभाग क्रं. ८ मधील नागरिकांनी विलास शिंदे यांना याबाबत कळवले.

यावर शिंदे यांनी तोडगा काढत मनपा आयुक्त कैलास जाधव वैद्यकीय अधिकारी यांची परवानगी घेऊन नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल ला सोबत घेत सिरीन मेडोज भागातील नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

आज रोजी म्हणजेच पहिल्या दिवशी ५५० नागरिकांनी लास गेहतली असून आजच पाचशे पेक्षा अधिक नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या