भाजप नेत्यांकडून राज्यात अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (NCP President MP Sharad Pawar) यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याला आता पावणे दोन वर्षे पूर्ण झाली आहे. सरकार स्थापन झालेल्या दिवसापासून भाजपाचे (BJP) अनेक नेते सरकार कोसळणार, सरकार पडणार, अशी वक्तव्य करत आहेत. केवळ अस्थैर्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून (BJP Leder) होत असल्याची टीका (criticism) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai) यांनी केली. महाराष्ट्रात पुढचे 25 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

शनिवारी मंत्री देसाई परभणीकडे (Parbhani) जात असताना काही वेळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी एकत्र येऊन खा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. हे सरकार 25 वर्षे टिकणार असून भाजप नेत्याकडून वेळोवेळी सरकार पडणार अशी वक्तव्य करून राज्यात अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. पावणे दोन वर्षात सरकारवर अनेक नैसर्गिक, आर्थिक संकटे आली. या सर्व संकटाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोंड देऊन मात केली आहे.

सीबीआय (CBI), ईडीकडून (ED) रात्रीच कोणाला अटक होईल, सकाळी कोणाला अटक होईल अशी भविष्यवाणी (Prophecy) एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने करणे योग्य नाही, यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी अधिकृत सांगितले असेल तर त्यात तथ्य असल्याचे मंत्री देसाई यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील भेट राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नासंदर्भात झाली असावी. देवेंद्र फडणवीस व शरद पवार (Devendra Fadnavis and Sharad Pawar) यांच्या भेटीसंदर्भात आपल्याला कल्पना नाही, असेही मंंत्री देसाई यांनी सांगितले.

संसर्ग टाळण्यासाठी मर्यादित वारी

पायी वारीला परवानगी दिली असती तर दर्शनासाठी होणार्‍या गर्दीतुन संसर्गाचा फैलाव होण्याची भीती होती. त्यामुळेच मर्यादित वारकर्‍यांना वारीसाठी परवानगी दिल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिले. गत वर्षाप्रमाणेच यंदाही बसने वारी पंढरपूरला जाणार आहे. सर्व वारकरी संप्रदायातील संघटनांशी, प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. पायी वारीला परवानगी दिली असती तर आजूबाजूच्या गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असती. त्यातून संसर्गाचा धोका निर्माण झाला असता. हा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मर्यादित वारकर्‍यांना वाढीसाठी परवानगी दिली असल्याचे ते म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *