Thursday, April 25, 2024
Homeनगरगृहरक्षक दल जवानांना तीन महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा

गृहरक्षक दल जवानांना तीन महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

कोव्हिड संकटात अहोरात्र काम करणार्‍या गृहरक्षक दलाच्या जवानांचे मानधन थकले असून तीन महिन्यांपासून मानधनाच्या

- Advertisement -

प्रतीक्षेत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी जिल्हा कार्यालयात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला असताना देखील जिल्हा होमगार्ड कार्यालय व पोलीस दादांच्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस ठाण्याच्या कंपनी चालकांच्या हलगर्जीपणामुळे मानधन वेळेत जमा होत नाही. महिनाभर काम करून होमगार्ड जवानांना बंदोबस्त प्रमाणपत्र कंपनी चालकांकडून वेळेत न मिळाल्याने मानधन बँकेत जमा होत नाही.

याला संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कंपनी चालक हे जबाबदार असणार असे संकेत देखील जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक यांनी आपल्या आदेशात दिलेले आहेत.

तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांकडून होमगार्ड जवानांना पोलीस प्रमाणपत्र वेळेत देत नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करण्याची मागणी हे जवान करत आहेत.

पोलीस प्रशासनाच्या अधीन राहून होमगार्ड दिवसरात्र कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी चोखपणे पार पडतात तरी देखील मानधनाबाबत शासन बेफिकीर का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

होमगार्ड जवानांकडून महिनाभर बंदोबस्त करून घेऊन बंदोबस्त संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत जिल्हा कार्यालयात पोलीस प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. तरीदेखील कंपनी चालकांकडून उशिरा प्रमाणपत्र मिळत असल्याने जवानांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

– बाळासाहेब देवखिळे, प्रभारी समादेशक अधिकारी, नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या