हृदयविकाराच्या झटक्याने होमगार्डचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

पिंपळनेर – dhule

येथील खंडोजी महाराज यात्रोत्सवात बंदोबस्तावर असलेल्या एका होमगार्डचा (Home Guard) हृदयविकाराच्या (heart attack) झटक्याने मृत्यू झाला आहे.

कैलास गुलाब भारूड (वय 50 रा. डुक्करझिरा व ह.मु पिंपळनेर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil), अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक प्रशांत बच्छाव (Prashant Bachao) यांचे उपस्थितीत मयत होमगार्ड जवानास सन्मानपुर्वक हवेत ८ गोळीबार करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि साळुंखे, जिल्हा होमगार्ड केंद्र नायक दीपक चौधरी, केशव भालेराव., पिंपळनेर पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष खैरनार व मनोज पगारे उपस्थित होते.

दरम्यान होमगार्ड भारुड यांच्यासह एएसआय रतन सुर्यवंशी, पोना काळे यांना सोमवारी दि.5 रोजी यात्रोत्सवात आ.मा.पाटील हायस्कूलजवळ गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी फिक्स पॉइंट देण्यात आला होता.

रात्री 11 वाजेच्या सुमारास तिघे बंदोबस्त करीत असतांना होमगार्ड भारूड यांना अचानक घाम येवू लागला. तसेच ते छातीच्या डाव्या बाजुला हात लावून दाबू लागले. त्यादरम्यान अचानक त्याचा श्‍वास बंद पडला. ही बाब लक्षात येताच एका सहकार्‍याने त्यांना तोंडाने सीपीआर दिला. पंरतू भारूड यांना एक उलटी झाली. त्यानंतर त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना मालचे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *