Friday, April 26, 2024
Homeनाशिकबकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई | Mumbai

कोविड-19 मुळे (Corona Crisis) उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. २१ जुलै राजी बकरी ईद (Bakari Eid) साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने ( मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

- Advertisement -

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना (Religious programs) बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह (Eid Namaz Masjid Eidgah) सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार (Animal Market) बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने (Online Shopping) अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी (Kurbaani) करावी.

लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे ( Break The Chain) निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी (Public Place) गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या