Friday, April 26, 2024
Homeजळगावगृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जिल्हा दौऱ्यावर

गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव – Jalgaon

राज्याचे गृह मंत्री ना.अनिल देशमुख हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम…

- Advertisement -

रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 13.30 वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण. दुपारी 14.15 वा. अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार अनिल भाईदास पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 15.00 ते 15.45 वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 15.50 वा. अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 16.15 वा. हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

- Advertisment -

ताज्या बातम्या