Wednesday, April 24, 2024
Homeनगर24 डिसेंबर ते 31 डिसेंबरची मध्यरात्रीची पवित्र मिस्सा रद्द करणार - धर्मगुरु...

24 डिसेंबर ते 31 डिसेंबरची मध्यरात्रीची पवित्र मिस्सा रद्द करणार – धर्मगुरु फा. गायकवाड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नाताळ सणानिमित्त दर वर्षाप्रमाणे 24 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजीची मध्यरात्रीची होणारी पवित्र मिस्सा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

यावर्षी नाताळ सणाची व नविन वर्षाची मध्यरात्रीची प.मिस्सा होणार नाही. तसेच धार्मिक विधीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा.ज्यो गायकवाड यांनी केले आहे.

नाताळ सणानिमित्त लोयोला सदन चर्चच्या पॅरीश काउन्सिलची बैठक संपन्न झाली. यात दि. 24 डिसेंबर 2020 व 31 डिसेंबर या दरम्यान पवित्र मिस्साचे कार्यक्रम होणार आहेत. या सकाळी 7 वा. नियोजक -सेंट अ‍ॅन फॅमिली, सकाळी 9 वा. नियोजक- सेवक प्रतिनिधी, प्रेरक, सकाळी 11वा.नियोजक -लोयोला युवक मंडळ, सायंकाळी 5वा.नियोजक- फा. स्टाफनर प्रतिष्ठान, सकाळी 9 वाजेच्या मिस्सेला गर्दी होऊ नये म्हणून 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांनी व 10 वर्षांच्या आतील लहान मुला-मुलींनी सदर पवित्र मिस्सेत सहभागी होऊ नये. त्यांना इतर 3मिस्सांमध्ये सहभागी ह़ोता येईल

31 डिसेंबर 2020 रोजी 5-45वा.पवित्र मिस्सा सुरुवात होईल. पवित्र मिस्सा झाल्यानंतर सरल्या वर्षासाठी देवाचे आभार मानण्यासाठी पवित्र तास होईल. सदर भक्तिचे नियोजन लोयोला महिला मंडळ करणार आहे. भाविकांनी वरील सर्व धार्मिक विधीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा.ज्यो गायकवाड, सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, उत्तम गायकवाड, विजय त्रिभुवन, जॉन धीवर, प्रवीण सात्राळकर, विजय शेळके, डॅनियल साळवे, सौ.बेनिग्ना पवार, सौ.सुवर्णा बागुल, सौ. शोभा त्रिभुवन, सौ.लता बनसोडे तसेच सेंट अ‍ॅन व कनोसा सिस्टर्स आदींनी केले आहे.

चर्चमध्ये येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर ठेवावे, हातांना सॅनिटायझर लावून चर्चमध्ये प्रवेश करावा. असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या