Friday, April 26, 2024
Homeक्रीडाHockey World Cup 2023 : भारत-वेल्स आज आमनेसामने

Hockey World Cup 2023 : भारत-वेल्स आज आमनेसामने

मुंबई | Mumbai

हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) स्पर्धेत भारतीय संघाचा (Team India) पुढील सामना उद्या गुरुवारी वेल्स (Wales) संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले ‘हे’ मोठे बदल

भारतीय संघाचा स्पर्धेतील हा तिसरा सामना असणार आहे. वेल्स संघाची कामगिरी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे भारतीय संघाला स्पर्धेतील आपला मोठा विजय संपादन करण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाला स्पर्धेत आतापर्यंत १ विजय संपादन करता आला आहे. दुसरा इंग्लंडविरुद्ध झालेला सामना ०-० असा बरोबरीत सुटला आहे. भारतीय संघाच्या खात्यात सध्या ४ गुण जमा आहेत. वेल्स संघावर विजय संपादन करून भारताला अव्वल स्थान प्राप्त करण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाने आपल्या सलामी सामन्यात स्पेन संघावर २-० ने विजय संपादन करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती.

काय सांगता? 18 लाखांचा ‘चोरी’स गेलेला रस्ता शोधण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांचे पथक जंगलात

वेल्स संघाला इंग्लंड संघाने ५-० असं पराभूत केलं आहे दुसऱ्या सामन्यात स्पेन संघाने ५-१ असं पराभूत केल्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पर्धेचं आयोजन भारतात होत असल्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे आपल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होते यावर भारतीय संघाचा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे.

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या