Monday, April 29, 2024
HomeUncategorizedवर्क फ्रॉम होम करताय?

वर्क फ्रॉम होम करताय?

हल्ली घरून काम करणे किंवा वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रूजते आहे. घरातून काम करण्याची सुलभता, लवचिकता असते, त्यामुळे हल्ली अधिकांश लोक या संकल्पनेविषयी विचार करू लागले आहेत. अर्थात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना वाटते तितकी सोपीही नाही. वर्क फ्रॉम होम संकल्पनेशी अनेक आव्हानेही निगडीत आहेत. सर्वात महत्त्वाचे आव्हान असते ते कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करणे आणि व्यक्तीची कार्यक्षमता प्रभावित होऊ नये. त्यामुळे घरातून काम करताना किंवा वर्क ङ्ग्रॉम ऑङ्गिस करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

योग्य जागेची निवड : घरात ऑफीस करूया असे म्हणून भागत नाही, काम पूर्ण होत नाही. सर्वात महत्त्वाचे आहे ते घरातील कोणत्या भागात किंवा कोणत्या खोलीचे रूपांतर ऑफीसमध्ये करायचे आहे. प्रत्येकाकडे अगदी सर्वोत्तम जागा उपलब्ध असेल असेही नाही. त्यामुळे कामाची जागा ठरवताना विचार तर करावा लागेलच. मग बेडरूम, बैठकीची खोली किंवा एखादा कोपरा जिथे ऑफीसचे टेबल ठेवू शकतो. ऑफीससाठीचे टेबल ठेवताना आपले काम किती वेळ किंवा किती तास असेल याचाही विचार केला पाहिजे.

- Advertisement -

फर्निचर निवडताना : ऑफीस घरातच सुरू करायचे तर फर्निचर कोणते आणि कसे करायचे याचाही विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आरामदायी आणि कमी जागेत मावेल अशा प्रकारचे फर्निचर निवडावे.

प्रकाश व्यवस्था : तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशाची व्यवस्था. या खोलीतील प्रकाशव्यवस्था आपल्या कामावर किंवा कार्यक्षमतेवर परिणाम करणारी असते. टेबलावर लाईट असावी. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करायचे असेल तर पांढर्‍या रंगाचा लाईटही चालतो.

कामाचे तास : घरचे काम आणि ऑफीसचे काम यांचे तास ठरवून वेगळेच ठेवले पाहिजेत. त्यानुसार काम केले पाहिजे. घरातील काम आणि ऑफीसचे काम यांची सरमिसळ होऊ नये, त्या दोन गोष्टी वेगळ्याच ठेवल्या पाहिजेत.

पार्टिशनचा वापर : ऑफीसची खोली किंवा कोपरा असा हवा की जिथे घरातील इतर लोकांची ङ्गारशी ये- जा होणार नाही. जेणेकरून ऑफीस हे ऑफीससारखेच राहील. दुसरी गोष्ट म्हणजे बैठकीच्या खोलीतील एका भागात ऑफीस असेल तर मध्ये पार्टिशनचा वापर करावा.

वायुवीजन उत्तम असावे : क्रॉस व्हेंटिलेशन असेल अशी जागा ऑङ्गिससाठी निवडावी. त्यामुळे काम करताना उर्जा मिळेल आणि उत्साहही वाटेल. हवा नसणारी जागा कार्यक्षमतेवर परिणाम करणारी असते. उत्तम हवा येणारी, प्रकाश असणारी जागा ही कामाचा उत्साह वाढवते. त्यामुळे दिवसभर आपण सकारात्मकतेने ऑफीसचे काम करू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या