Saturday, May 11, 2024
Homeजळगावहिंगोणा - सावखेडा गटात एक कोटी साडे तीन लक्ष रुपयाच्या विकास कामांना...

हिंगोणा – सावखेडा गटात एक कोटी साडे तीन लक्ष रुपयाच्या विकास कामांना प्रारंभ

यावल Yaval (प्रतिनिधी )

हिंगोणा- सावखेडा (Hingona- Savkheda) जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सविताताई अतुल भालेराव (Savitatai Atul Bhalerao) यांच्या प्रयत्नातून हिंगोणा जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटातील विविध गावात एक कोटी साडेतीन लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन (Bhumi Pujan) झाले.

- Advertisement -

बांधकामाचे उद्घाटन प .स समितीच्या सभापती पल्लवीताई पुरूजीत चौधरी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरालाल भाऊ चौधरी जि प सदस्य सौ सविता ताई भालेराव तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे उपसभापती योगेश भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध निधी अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य सविता अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून सावखेडा -हिंगोना जि.प गटात सावखेडा येथे शाळा खोल्या बांधकाम 17 लक्ष रुपये शाळा खोली ग्राउंड मध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे 5 लक्ष रुपये अंगणवाडी पूर्ण झालेले बांधकाम 8.50 लक्ष रुपये तसेच मोहराळे ग्रामपंचायत अंतर्गत जामुनसिरा अंगणवाडी पांढरी वस्ती बांधकाम प्रत्येकी साडेआठ लाख रुपये तसेच

वड्री येथे नवीन शाळा खोल्या बांधकाम 17 लक्ष रुपये वड्री येथील इदगाह जवळ कॉंक्रिटीकरण 3 लक्ष रुपये व ड्री ,मोटक-या वस्तीत काँक्रिटीकरण 6 लक्ष रुपये गटार बांधकाम 3 लक्ष रुपये वड्री – मावडा रस्ता डांबरीकरण करणे 15 लक्ष रुपये, तसेच कोळवद- कोरपावली रस्ता 12 लक्ष रुपये अशा एकूण एक कोटी साडेतीन लाख रुपयाचे विविध कामांचे भूमिपूजन प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती पल्लवी पुरुजित चौधरी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी, जि. प. सदस्य सविता ताई अतुल भालेराव, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, उपसभापती पंचायत समिती यावल, योगेश भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

याप्रसंगी कृषिभूषण नारायण बापू चौधरी, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी, कांचन ताई फालक ,भाजपाचे पंचायत समिती गटनेता दीपक अण्णा पाटील, भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैन सिंग राजपूत, देविदास नाना पाटील, कृउबास संचालक तथा विकास सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश फेगडे, लहू पाटील, भाजपा वड्री येथील कार्यकर्ते अतुल भालेराव, लक्ष्मण बडगुजर, बेबाबाई विकास पाटील, सरपंच सावखेडा मुबारक सुभेदार तडवी, उपसरपंच दिनेश पाटील, भुषण पाटील, कमलाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, बंडू पाटील , मोहराळा येथील सरपंच नंदाताई गोपाळ महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी, संजीव महाराज ,गोपाळ महाजन, अकिल तडवी ,प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, राजू तडवी, यशवंत पाटील, सलीम तडवी, ( सर ) अजय भालेराव (वड्री सरपंच ) उपसरपंच पंकज चौधरी (उपसरपंच वड्री ),नबाब तडवी, उमाकांत पाटील ,ललित चौधरी , सरदार तडवी, पूजा तडवी, नयना चौधरी ,वैशाली चौधरी , आर. के. चौधरी ,विलास चौधरी (सर ),गोविंदा सुरवाडे, सुनील पाटील आणि प्रत्येक गांवचे विविध नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या