Friday, April 26, 2024
Homeनगरमोटारसायकल-कारचा अपघात; इसमाचा नदीपात्रात पडून मृत्यु

मोटारसायकल-कारचा अपघात; इसमाचा नदीपात्रात पडून मृत्यु

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील गोदावरी नदीवरील (Godavari River) हिंगणी पुलावर (Hingani Bridge) मारुती कारने दुचाकीला धडक (Car and Bike Accident) दिल्याने दुचाकीवरील दोन इसम नदी पात्रातील पाण्यात पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन त्यातील एक जण पाण्यात बुडल्याने जागीच ठार (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल

तालुक्यातील हिंगणी पुलाला कठाडे नसल्याने अनेकदा अपघात (Accident) घडत असतात. त्यातच बुधवारी या पुलावरून जाणार्‍या कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत धारणगाव येथील रहिवासी शांताराम बाबुराव आहेर (वय 50) यांचा पुलावरून पाण्यात पडून बुडून मृत्यू (Death by Drowning) झाला. तर त्याचे सहकारी बाळासाहेब रनशूर अपघातात (Accident) जखमी झालेले आहे. दोन्ही इसम हिंगणीकडून मुर्शतपूरकडे येत असतांना हा अपघात (Accident) झाला.

समन्यायी पाणी वाटप : मराठवाड्याचे भागेल पण.. नगर, नाशिकच्या शेतीचे काय ?

येथे मासेमारी करणारे व स्थानिक नागरिकांनी दोन्ही इसमांना पाण्याच्या बाहेर काढत कोपरगांव ग्रामीण रुग्णाला दाखल केल. जखमी (Injured) बाळासाहेब रणशूर यांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून शांताराम आहेर यांचा मृतदेह शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत. हिंगणी पुलाला कठाडे असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाला कठाडे बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप होणारराहात्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

- Advertisment -

ताज्या बातम्या