Thursday, April 25, 2024
Homeनगरअन्न सुरक्षा कार्डधारकांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची हरभरा डाळ रेशनवर मिळणार

अन्न सुरक्षा कार्डधारकांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची हरभरा डाळ रेशनवर मिळणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अन्न सुरक्षा कार्डधारकांना गेल्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याची न मिळालेली हरभरा डाळ रेशन दुकानवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

याबाबत हिंदू एकता आंदोलन पक्षाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

गेल्या मार्च महिन्यापासून करोना महामारीने देशात उच्छाद मांडला आहे. गोरगरिबांना आर्थिक अडचणीतून जावे लागत होते. यामुळे पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशनवर 5 किलो तांदूळ माणसी मोफत देण्यात येत होते.

जून महिन्यात मोफत तांदळाबरोबरच हरभरा डाळ देण्यात आली होती. मात्र, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याची डाळ देण्यात आली नव्हती. ती आता पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन दुकानांमध्ये पुरवठा खात्याकडून लवकरच उपलब्ध होणार आहे.

या मागणीचा हिंदू एकता आंदोलन पक्षाने वेळोवेळी निवेदने व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देऊन पाठपुरावा केला होता. या मागणीचा पुरवठा खात्याने गांभिर्याने विचार केला व सदर डाळ उपलब्ध करून देणार आहे. पुरवठा खात्याच्या या निर्णयाचे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, प्रसिद्धीप्रमुख अमिरभाई जहागीरदार, मनोहर बागुल, चिलिया तुवर, वसंत गायकवाड, विजय जगताप, नागनाथ डोंगरे, राजेंद्र जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर, बाळासाहेब आगळे, अविनाश कनगरे, भिकन शेख, सोमनाथ जगताप, गुरु भुसाळ, संजय ढगे, वसंतराव धंदक, बाबा ढगे आदींनी स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या