Friday, April 26, 2024
Homeनाशिकसेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

हिंदी दिवसानिमित्त सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये हास्य कवी संमेलन घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

- Advertisement -

यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कथा सादरीकरण केले. यावेळी मुख्याध्यापक संजय पाटील यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगितले.

हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता ४ थीचे विद्यार्थी दिक्षिका व करनवीर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने व बायबल मधील पवित्र वचन पठनांनी झाली यानंतर सुंदर प्रार्थना गीते सादर करण्यात आली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील, प्रमुख पोर्णिमा बोरसे त्यांच्याही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचा समारोप शालेय गीत व राष्ट्रगीताने झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या