Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश“राष्ट्रवादाच्या नावाखाली...”; अदाणींच्या ४१३ पानांच्या उत्तरावर Hindenburg चं प्रत्युत्तर

“राष्ट्रवादाच्या नावाखाली…”; अदाणींच्या ४१३ पानांच्या उत्तरावर Hindenburg चं प्रत्युत्तर

दिल्ली | Delhi

अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समुहावरील गैरव्यवहाराच्या अहवालामुळे सध्या शेअर बाजार आणि देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या बुधवारी समोर आलेल्या अहवालात अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉकची हेराफेरी आणि खात्यातील फसवणुकीत गुंतला असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या सर्व आरोपांना अदाणींनी रविवारी रात्री तब्बल ४१३ पानांचं उत्तर दिल्यानंतर त्यावरून हिंडनबर्गनं खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादाचा मुखवटा घालून फसवणूक टाळता येणार नाही. अदानी समूहाने खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला. आरोपांना उत्तर देण्याऐवजी अदानी समूह राष्ट्रवादाचा अवलंब करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंडेनबर्गने आपल्या नवीन पोस्टमध्ये म्हटले की, “आम्ही मानतो की भारत एक व्हायब्रन्ट लोकशाही आहे आणि एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. अदानी समूह भारताच्या भविष्याशी खेळत आहे, असा आमचा विश्वास आहे. हा समूह राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाची लूट करत आहेत.”

अदानी काय म्हणालेत?

अदानी उद्योगसमूहाने हा रिपोर्ट म्हणजे भारताविरूद्धचा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्गचा हा रिपोर्टचा मूळ उद्देश हा केवळ अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे हा होता. हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही तर, भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्त्वाकांक्षेसह भारतीय संस्थांवर पद्धतशीर हल्ला असल्याचे अदानींनी म्हटले आहे.

दरम्यान भाजपचे नेते माजी खासदार सुब्रम्हण्यम स्वामी अदानी यांना टोला लगावला आहे. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी फ्रांसचा राजा किंग लुईस याचा संदर्भ देत अदानींना टोला लगावला आहे. भारतावर सुनियोजित हल्ला!! फ्रांसचा राजा किंग लुईस म्हणाला होता “Apre moi Le deluge” अदानी यांनीही तेच म्हटले आहे; “मी जिवंत असेल तरच भारत देखील”

- Advertisment -

ताज्या बातम्या