Friday, April 26, 2024
Homeनगरहिंद सेवा मंडळ निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 34 उमेदवार

हिंद सेवा मंडळ निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 34 उमेदवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील प्रसिध्द शतक महोत्सवी शिक्षण संस्था असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या 21 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात दाखल झाले आहेत. येत्या 13 मे रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, या दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अकोले व मिरजगाव या विभागांच्या प्रत्येकी एका जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अर्ज माघारीच्या दिवशी मुदत संपल्यावर होणार आहे.

- Advertisement -

हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्ष व मानद सचिव या प्रत्येकी एका जागेसह नगर विभागातील कार्यकारिणीच्या 10 जागा, श्रीरामपूर विभागातील 3 तसेच अकोले व मिरजगाव विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण 17 जागांसह सेवक प्रतिनिधींच्या सहा जागा मिळून 23 जागांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. अशोक कोठारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. योगेश काळे काम पाहत आहेत.

दरम्यान विश्वस्त मंडळाच्या या निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी एकाहून जास्त अर्ज दाखल केले होते. रविवारी झालेल्या छाननीत एकापेक्षा अधिकचे अर्ज रद्द झाले. शिवाय कोणीही कोणाच्या उमेदवारीवर हरकत घेतली नाही. त्यामुळे छाननीत सर्व अर्ज वैध झाले. आता येत्या 13 मे रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर 29 मे रोजी मतदान आणि 30 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आवश्यक तयारी सुरू केली आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवार

अध्यक्ष पदासाठी (जागा 1)- मोडक शिरीष दामोदर व बुडुख मुकुंद राजाराम, मानद सचिव पदासाठी (जागा 1)- जोशी संजय दादा, गट्टाणी अनिलकुमार पांडुरंग व बुडुख मुकुंद राजाराम, कार्यकारिणी सदस्यपदासाठी अहमदनगर विभाग- (जागा 10)- फडणीस अनंत रामचंद्र, बोरा अजित सिमरतमल, झालानी जगदीश रुपनारायण, बेडेकर सुजित श्रीकांत, सारडा मधुसुदन झुंबरलाल, डॉ. कोठारी पारस देवीचंद, गट्टाणी अनिलकुमार पांडुरंग, खेर मकरंद विष्णू, देसाई अनंत विठ्ठल, कोठारी सुमतीलाल बन्सीलाल, कुलकर्णी महेश रामचंद्र, चोपडा संजयकुमार फुलचंद, चोपडा मीना संजयकुमार, सौ. कुलकर्णी ज्योती रामचंद्र, मुळे सुहास चिंतामण. श्रीरामपूर विभाग- (जागा 3)- देशपांडे अनिल बाळकृष्ण, उपाध्ये बस्तीराम हनुमानदास, श्रीगोड रणजित रूपचंद व मुळे पुरूषोत्तम दिगंबर. अकोले विभाग- (जागा 1)- शहा दिलीपकुमार हिरालाल व मिरजगांव विभाग (जागा 1)- डॉ. झरकर रमेश मुरलीधर. सेवक प्रतिनिधी पदासाठी (जागा 6) ः राजपुरे गणेश दशरथ, देशमुख योगेश प्रभाकर, उरमुडे विठ्ठल बाळु, जोशी आदीनाथ रेवणनाथ, जोशी अधिक सुरेश, लकडे कल्याण नामदेव, केणे नितीन गोविंद, सुसरे सुनील दत्तात्रय, पाखरे गिरीश माणिकराव व कुलकर्णी बाळासाहेब उद्धवराव असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या