Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदेवदूतच सारथी

देवदूतच सारथी

हिमाचल वर्षभर अतिशय थंड व उन्हाळ्यात तळपत्या सूर्यापासून मनास व शरीरात थंडावा देणारा प्रदेश. एखाद्या मोठ्या फ्रीजच्या पोटात बसल्याचे कायम फिलिंग देणारा.

खरे तर हा प्रदेशच एक पर्यटन स्थळ आहे. यात आपल्याला नेमके काय आवडते आपणच ठरवायचे. मग इको असो वा सनसेट-सनराईज पॉईंट, साहसी खेळ, पॅराग्लायडिंग, स्कियिंग, हायकिंग सारे काही यात अंतर्भूत आहे. यातच आपली मंदिरे, बौद्ध ोपशीींशीळशी, नद्यांचे संगम भक्तिभाव व विरक्ती जागवणारे, मोठमोठे हायड्रो प्रकल्प, पूल आणि रस्ते प्रकल्प तोंडात बोट घालायला लावणारे. भारत खरच सुंदर आहे. सौंदर्यदृष्टी मात्र हवी. मी हिमाचल प्रदेशाच्या एवढी प्रेमात आहे की त्याबद्दल किती आणि काय लिहू असे होऊन गेलेय. आठवणी ताज्या असताना त्या शब्दांत उतरवण्याचा हा प्रयत्न आहे.

- Advertisement -

रथ व सारथी

आमच्या हिमाचल टूरसाठी कोरा करकरीत व चशीलशवशी चे तीन हजार लल क्षमतेचे शपसळपश असलेला व 27 माणसे बसतील एवढा मोठा टेम्पो तैनात करण्यात आला होता. 16 माणसांत खिडकीत कोण बसणार हा मुद्दा कधीच आला नाही. गप्पा, गाणी, संगीत, खाणे याचबरोबर निसर्गाचा आस्वाद…कधी कधी नुसतेच शांत निरीक्षण, मनन, चिंतन…ज्याला जसे आवडेल तसे. तेवढी स्पेस प्रत्येकास होती.

आमच्या पहिल्या सारथ्याने पहिल्या दिवशीच रंग दाखवण्यास सुरुवात केली. खूपशी मनमानी, वेळकाढूपणा, फोन सतत कानाशी व सामान्यतः प्रत्येक बाबतीत बेफिकिरी.. सबुरीने किती घ्यायचे? यात्रेकरूत कुजबूज होऊ लागली. मनात शंका व भीती वाटू लागली. याच माणसाच्या हाती रथाचे चक्र व सर्व यात्रेकरूंच्या आयुष्याची दोरी..

सिमल्याला पहिल्या हरश्रीं आधीच त्याच्या बदलीची मागणी मान्य झाली व त्याच्या जागी आलेल्या मनोहरलालने त्याची किंमत पुरेपूर सिद्ध केली..कशी? लिहीनच त्याबद्दल. कारण ते लिहिल्याशिवाय ही लेखमाला पूर्ण होऊच शकत नाही. जणू देवाने पाठवलेला देवदूतच सारथी म्हणून आमच्या रथासाठी आला होता. अतिशय सालस, निर्व्यसनी व धार्मिक वृत्तीच्या मनोहरलालचे कौतुक सर्वांनी पुढे त्याला बक्षीस देऊन छोटा समारंभ करून अगदी उत्स्फूर्तपणे केले. (क्रमश)

- Advertisment -

ताज्या बातम्या