Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात - उदय सामंत

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात – उदय सामंत

मुंबई –

अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या 1 ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यादरम्यानच 10 ऑक्टोबरपासूनच निकाल लागण्यास

- Advertisement -

सुरुवात होणार आहे. शिवाय अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा देखील एका महिन्यात घेतली जाणार, असल्याची महत्त्वाची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

अंतिम वर्षात 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 90 ते 92 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी नोंद केली आहे. उरलेले विद्यार्थी आपल्या नजीकच्या केंद्रात ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा देणार आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज असल्याचं सामंत म्हणाले. ऑफलाइन पद्धतीनं परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेणंही आवश्यक आहे. त्यामुळे सर्व विभागांनी एकत्र येऊन पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला मदत करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याचं ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रश्नसंच, मॉक टेस्ट यानंतर काही कारणास्तव परीक्षा राहिल्या तर त्या तातडीनं घेण्यात येतील. नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीनं महिन्याभरात घेतली जाईल आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही. गेल्यावर्षीप्रमाणेच हे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये, असंही त्यांनी नमूद केलं.

प्रमाणपत्राकडे पूर्वीप्रमाणेच पाहावे –

विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही, पदवी प्रमाणपत्रांचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावा. याकडे जर कोणती तसं बघत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा देण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या