Friday, April 26, 2024
Homeनगरउच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या शिक्षकांची पायी दिंडी यात्रा तूर्त स्थगित

उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या शिक्षकांची पायी दिंडी यात्रा तूर्त स्थगित

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

दिनांक 30 सप्टेंबर 2020 पासून राज्यातील 146 व 1638 उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी

- Advertisement -

त्वरीत शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचे पदाधिकारी प्रा. कर्तारसिंग ठाकूर, प्रा. अनिल परदेशी, दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही पायी दिंडी आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयात निवेदन देऊन येवल्यावरून संगमनेरकडे पदयात्रा करीत 70 किलोमीटर अंतर पूर्ण करून तीन दिवसांनंतर संगमनेर येथे पोहोचली.

पायी दिंडीची फलश्रुती म्हणजे पायी दिंडीच्या पहिल्या दिवशी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत पहिल्याच दिवशी आपल्या कृती समितीचा अहवाल कॅबिनेटसाठी सकारात्मकरित्या सुपूर्द केला व याबाबतीत नाशिक विभागाचे आमदार किशोर दराडे, आ. डॉ. सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, आमदार विक्रम काळे यांचा देखील पाठपुरवठा परंतु वारंवार सातत्याने आश्वासन मिळतात.

प्रत्यक्षात काही होत नसल्यामुळे पायी दिंडीतील शिक्षकांनी आपला पदयात्रेचा निश्चय ठाम ठेवत तीन दिवसांमध्ये पायी दिंडीचे अंतर कापले याप्रसंगी रात्रीला पायी दिंडीचे आगमन संगमनेर याठिकाणी झाले. त्यावेळी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी पायी दिंडीत सहभागी असलेल्या सर्व शिक्षकांशी सहानुभूतीपूर्वक चर्चा केली व शिक्षकांना आश्वस्त केले.

महसूलमंत्री थोरात हे विशेषतः शिक्षकांच्या प्रश्नाच्या बाबतीत खूप गंभीर आहेत आणि यावेळी हा प्रश्न साहेबांना सोडवायचा आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आपला प्रश्न यावेळेला नक्कीच सुटणार आहे. सकाळी साडेदहा वाजता नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली व पायी दिंडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सर्व शिक्षकांशी बोलत असताना डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले की आपण निश्चिंत राहा येणार्‍या आठवड्यामध्ये ज्या शाळांना 20 टक्के अनुदान द्यायचे आहे,

अशा उच्च माध्यमिक शाळा व ज्या शाळांच्या टप्पा वाढ करायचा आहे अशा माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक अहवाल समितीने कॅबिनेट समोर ठेवला आहे व या पद्धतीने निर्णय होण्याच्या शक्यता आहेत तरीदेखील तुमच्या शिष्टमंडळास पुढील काही चांगले निर्णय घेण्यासाठी मी माझ्या नेतृत्वात आपल्याला मुंबईला घेऊन जातो व महसूल मंत्री, राज्याचे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घालून देतो. आपण तूर्त आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती डॉ. तांबे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षकांना केली.

डॉ. सुधीर तांबे यांच्या विनंतीचा मान ठेवत तूर्तास पायी दिंडी आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. पायी दिंडी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. यासोबत या पायी दिंडी मध्ये प्राध्यापक गुलाब साळुंखे, प्राध्यापक दिनेश पाटील, प्राध्यापक महेंद्र बच्चाव, सुरेश कापुरे, कैलास पवार, राजेंद्र साळुंखे, विजय सोनवणे, निलेश गांगुर्डे, दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. पी. पाटील अशा राज्यभरातील पदाधिकारी व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या